Breaking News

मुहम्मद अली जिना हे भारताचे शत्रू - केशव प्रसाद मौर्य

कानपूर - पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांच्या तैलचित्रावरुन चाललेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जिनांना ’देशाचे शत्रू’ असे संबोधले आहे. जिना हे देशाचे शत्रू होते. या देशाने शत्रूंना कधीही आपल्या हृदयात स्थान दिले नाही, असे मौर्य यांनी म्हटले आहे. अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात मुहम्मद अली जिना यांचे चित्र लावले आहे. भाजपचे सतीश गौतम यांनी विद्यापिठाचे कुलगुरू तारीक मन्सूर यांच्याकडे याबाबतचे स्पष्टीकरण मागितले. जीना देशाच्या फाळणीसाठी जबाबदार होते. या देशात त्यांना मान दिला जाऊ शकत नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हटले होते. आदित्यनाथ यांनी विद्यापिठाच्या व्यवस्थापनाकडून याचा अहवाल मागवला आहे.