Breaking News

प्लास्टिकबंदीमुळे 3 लाख नोकर्‍यांवर गदा प्लास्टिक उद्योगाला 15 हजार कोटींचा फटका


राज्यात लागु करण्यात आलेल्या प्लास्टिक अंमलबजावणीमुळे तब्बल 15 लाख कर्मचार्‍यांना आपला रोजगार गमावण्याची वेळ आली आहे. तर प्लास्टिक उद्योगाला 15 हजार कोटी रूपयांचा फटका बसण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. 23 जूनपासून प्लास्टिबंदीची अंमलबजावणीला सुरूवात झाल्यामुळे थर्माकोल आणि प्लास्टिक उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. या उद्योगामुळे तब्बल 15 हजार कोटीचे नुकासान अंदाजित असून, जवळपास 3 लाख जणांच्या नोकर्‍यांवर गदा आली आहे, असे प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय सरचिटणीस निमित पुनामिया यांनी सांगितले. प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनशी संबंधित जवळपास अडीच हजार सदस्यांना आपल्या दुकांनाना टाळे ठोकावे लागल्याचेही पुनामिया यांनी सांगितले. तसेच, प्लास्टिकबंदी भेदभाव करणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
23 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक उद्योगांना प्लास्टिकचं उत्पादन थांबवण्यास सांगितले होते. वन टाईम युझ बॅग, चमच, प्लेट्स, बॉटल यांचे वितरणही थांबवण्याचे आदेश होते. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे 23 जूनपासून महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकवरील बंदी लागू केली. प्लास्टिक उद्योगातील बेरोजगारीचा महाराष्ट्राच्या विकासदरावर परिणाम होईल. तसेच, प्लास्टिक उद्योग क्षेत्राने काढलेल्या कर्जाच्या परताव्यावेळीसुद्धा अडचणी वाढणार आहेत. महाराष्ट्रात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली असून, पहिल्या वेळेस कुणाकडे प्लास्टिक सापडल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. दुसर्‍या वेळेस 10 हजार आ णि तिसर्‍या वेळेस 25 हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे.