महसूलमधील 142 जणांच्या बदल्या
सोलापूर, दि. 02, जून - महसूल प्रशासनातील जिल्हाधिकारी यांनी बदलीस पात्र असलेल्या 142 कर्मचार्यांच्या बदल्या केल्या. कर्मचार्यांची यादी जाहीर करण्यात आली. बदली झालेल्या ठिक ाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 65 लिपीक, 52 अव्वल कारकून व 25 मंडलाधिकारी यांचा समावेश आहे. शासन नियमानुसार समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले. महसूलमधील 12 कर्मचारी निवृत्त वयाची 60 वर्षे पूर्ण झालेले महसूल प्रशासनातील 12 कर्मचारी गुरुवारी निवृत्त झाले. निवृत्तीबद्दल कार्यालयांमध्ये त्यांचा सत्कारही करण्यात आला. एक लेखाधिकारी, तीन मंडलाधिकारी, चार शिपाई व चार तलाठी यांचा समावेश आहे. सत्कारानंतर निवृत्त कर्मचार्यांनी सेवा काळातील काही आठवणी जाग विल्या तर विभागप्रमुखांनी पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.