नाशिक: दोघांना शस्त्रासह अटक
नाशिक, दि. 02, जून - इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने आज शुक्रवारी (दि. 1) पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास सराफ लॉन्स जवळ 16 तलवारी घेऊन आलेल्या दोघांना अटक केली आहे. हे दोघे दुचाकीवर तलवारी घेऊन आले होते. यातील एक संशयित पंजाबचा आहे.
इंदिरानगर पोलीस कर्मचारी खंडाबहाले नेहमी प्रमाणे गस्तीवर असताना सराफ लॉन्स जवळील साई वॉटर सर्व्हिसेस जवळ हत्यारांसह दोन संशयित उभे असल्याची खबर मिळाली.ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे आपल्या पथकासह परिसरात पोहोचले. सापळा लावून पकडत त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून तब्बल 16 तलवारी आढळून आल्या.
गुरुचरणसिंग बलकार सिंग (26, रा. गुरुद्वारा थाडा साहीब, लोदीपूर, ता. आनंदपूर जि. रुपनगर, पंजाब), महेंद्र सुदाम धबडगे (28, रा. रंगरेज मळा, इंदिरानगर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत हत्यारे जप्त करून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही हत्यारे कोठून आणि कुणासाठी आणली गेली याचा तपास पोलीस करत आहेत.