Breaking News

महापालिकेच्या 12 माध्यमिक शाळा स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने सुरु


पुणे - पुणे महापालिकेच्या 12 माध्यमिक शाळा स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने सुरु आहेत. त्या संस्थेच्या अनामतीचे दहा लाख रुपये माफ करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासाने स्थायी समिती समोर ठेवला आहे. 12 माध्यमिक शाळा स्वंयसेवी संस्थेच्या माध्यातुन सुरु करण्यात येणार आहे. मात्र या संस्था दहा लाख रुपयांची अमानत रक्कम पालिकेकडे ठेवण्यास तयार नाहीत. त्याचे अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने स्वयंसेवी संस्था विघाथ्र्याकडुन कुठलेही शुल्क आकारत नाही. विघाथ्र्यांना मोफत शिक्षण देणार आहे. या स्वयंसेवी संस्था शाळा चाल विण्यासाठी फंड गोळा करत आहे. या शाळेच्या वर्गासाठी आवश्यक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करुन त्यांच्या वेतनाचा खर्च संस्था करत आहे.