34 व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबीराचे आयोजन
मुंबई - दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराने दि. 13 ते 19 जून, 2018 या कालावधीत रोज सायंकाळी 6.00 ते 8:00 या वेळात समर्थ क्रीडा भवन, शिवाजी उद्यान, दादर, मुंबई- 400 028, यथे 34 व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराचे आयोजन केले आहे.
5 वर्षावरील कोणीही व्यक्ती या शिबिरात प्रवेश घेऊ शकेल. शिबिरातील प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा नसून पालकांना विशेषतः महिलांनाही या शिबिरात प्रवेश दिला जाईल व त्यांचा वेगळा वर्ग असेल. मल्लखांब शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये खेळला जातो. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी यांनीही मोठ्या संख्येने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. शिबिरात मल्लखांबाचे विविध प्रकार, सूर्यनमस्कार, मुक्तहस्त व्यायाम व योगासने याचे प्रशिक्षण देण्यात येईल.
या शिबिरात समर्थच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नामवंत तसेच ’श्री शिव छत्रपती पुरस्कार’ विजेत्या खेळाडूंचे मार्गदर्शन शिबिरार्थींना लाभणार आहे. या शिबिरात शिकवलेल्या विषयांवर आधारित घेतल्या जाणार्या मानसिक व शारीरिक चाचण्यांमध्ये 60% गुण मिळविणार्या शिबिरार्थींना संस्थेत वर्षभर नियमित प्रशिक्षणासाठी प्रवेश प्राधान्य मिळेल. सर्व शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील. सर्वोत्कृष्ट शिबिरार्थी मुलगा व मुलगी निवडून त्यांना विशेष पुरस्कार देण्यात येईल. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे राज्य व राष्ट्रीय खेळाडू मल्लखांब, जलदीपासने, योग मनोरे इत्यादिंची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करतील. समारोप समारंभाला निवडक शिबिरार्थींना शिबिरात शिकलेले कौशल्य पाहुण्यांसमोर व पालकांसमोर दाखवण्याची संधी मिळेल.
मल्लखांब शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. मुंबईकरांमध्ये असिदिटी, अपचन या सारख्या रोगांवर हे शिबीर म्हणजे संस्थेच्या विविध उपक्रमांमधील एक उपक्रम असून कमीत कमी वेळात शरीराच्या सर्व भागांना जास्तीतजास्त व्यायाम देणार्या तसेच कोणत्याही खेळासाठी लागणार्या मूलभूत शारीरिक कुवती विकसित करणार्या या एतद्देशीय अस्सल मर्हाटमोळ्या पारंपा रिक भारतीय व्यायाम प्रकाराची ओळख या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांना व्हावी असा संस्थेचा प्रयत्न आहे.
प्रवेश अर्ज शुल्क रु. 10/- व शिबीर शुल्क र. 200/- आहे. श्री समर्थ व्यायाम मंदिर, क्रीडा भवन, शिवाजी पार्क, दादर (प), मुंबई 400 028 येथे, सायंकाळी 6 ते 8 या वेळात प्रवेश अर्ज मिळतील. पहिल्या 200 शिबिरार्थींना प्रवेश देण्यात येईल.
