गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्यावर कठोर कारवाई : पो. नि. इंगळे
शिर्डी : शिर्डीतील २०११ च्या खून प्रकरणात दंड आणि निर्दोष झालेल्या १२ जणांवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. त्यांच्या हालचाली तसेच दंडाची रक्कम पाहता कोणी आर्थिक पाठबळ आर्थिक सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न केल्यास अथवा शिर्डी परिसरात गुन्हेगारी कृत्य करणारे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सूतोवाच पो. नि. प्रताप इंगळे यांनी केले.
येथील रचित पाटणी आणि प्रविण गोंदकर या दोन तरुणांच्या खुनासंदर्भात नाशिक येथील मोका न्यायालयाने कुख्यात गुंड पाप्या शेखसह १२ जणांना मोका न्यायालयाने जन्मठेप आणि १ कोटी ३४ लाखाचा दंड केला होता. त्यात १२ जणांची निर्दोष मुक्तता झाली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना पो. नि. प्रताप इंगळे बोलत होते.