Breaking News

‘रुई’च्या रस्त्यांचे आमदार निधीतून डांबरीकरण : वाबळे


शिर्डी राहाता तालुक्यातील रुई गावातील चिकणे वस्ती ते लोढा गल्ली या रस्त्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या आमदारनिधीतून जवळपास ५ लाख रुपये खर्चाच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला. लोकनियुक्त संदीप वाबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन वाबळे, योगेश जपे, अशोक कोळगे, ज्ञानेश्वर वाबळे, भाऊराव शिरसाठ, फकिरा लोढा, अशोक लोढा, आबासाहेब जपे आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना सरपंच संदीप वाबळे म्हणाले, लगतच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, युवानेते डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून गावाचे प्रश्न मार्गी लावण्यसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु राहील. रुई शिवारातील इनामके वस्ती ते रुई सडे शिवरस्ता याच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपयांचा निधी जि. प. अध्यक्ष शालिनी विखे यांनी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी पंकज लोढा, बाळकृष्ण सुराळे, राजेंद्र राठोड, पवन गोसावी, महेश गागरे, आबासाहेब वाबळे, बबन शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी बबनराव सांगळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.