पत्रकारांसमोर कॉलर उडविणारे खा. शरद पवार पत्रकारासमवेत खोलीत अडकल्यानंतर म्हणतात... हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाय
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 59 व्या पुण्यतिथिनिमित्त सातार्यात आलेले माजी केंद्रियमंत्री खासदार शरद पवार पत्रकार परिषदेत षटकार मारून झाल्यानंतर अलगद म्हणतात लवकरच सातार्यातील कॉलर उडविणारे सुतासारखे मऊ होतील, असे म्हणत स्वत: कॉलर उडवून दाखवतात आणि एकच हशा होतो. मात्र, काही कालावधीत पत्रकार परिषद संपते आणि त्या खोलीतून बाहेर जाण्यापूर्वी त्यांना समजते की पत्रकार परिषद सुरु असलेल्या खोलीचा दरवाजा आपोआप लॉक झाला आहे. अशा प्रसंगातही पवार यांनी हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाय। असे गुणगुणत आपला हजरजबाबीपणा दाखवून बिकट प्रसंगातही हसतमुख कसे रहावे,याचे गुपितच जणू पत्रकारांसमोर मांडले. रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयातील एका दालनात खा.पवार यांची पत्रकार परिषद सुरु होती.यादरम्यान दालनाचा दरवाजा बंद केला.परंतु नंतर दरवाजा बंद झाल्याने तो उघडण्यासाठी संस्थेच्या कर्मचार्याची धांदल उडाली. परंतु बरेच प्रयत्नांनंतर दरवाजा उघडला गेला.पत्रकार परिषदेच्या अखेरीस सातार्यातील स्थानिक नेत्यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वावर चर्चा केली.त्यावेळी पत्रकारांनी कॉलर उडविणार्या नेत्यांबाबत खा. पवार यांना छेडले असता, त्यांनी स्वत:चीच कॉलर उडवून दाखवून आता जे कॉलर उडवित आहेत, त्यांची कॉलर योग्य वेळी सुतासारखी मऊ होईल. त्यासाठी काही काळाचा अवधी असल्याचे सांगत सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींकडे पत्रकारांचे लक्ष वेधले.