Breaking News

अग्रलेख विरोधकांची धुणी धुण्यातच धन्यता !

नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर म्हणजेच सुरूवातीचे अडीच ते तीन वर्ष मोदी यांना तगडा विरोधक नव्हता, परिणामी मोदी यांना आव्हान देऊ शकेल असा एकही पक्ष या तीन वर्षांत पुढे आला नाही. मात्र या एका वर्षांत नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल, त्यांचा सामना करू शकेल असे आव्हान विरोधकांनी देशात निर्माण केले आहे. ज्यात राहुल गांधी यांनी आघाडी घेतली आहे. कर्नाटक निवडणूकांच्या निमित्ताने हे स्पष्ट झाले आहे. मात्र केंद्रात भाजप सरकारला 26 मे रोजी चार वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. यानिमित्ताने भाजपाने आपल्या कामाचे प्रझेटेंशन करण्याऐवजी काँग्रेसचे 48 वर्षे विरुद्ध भाजपचे 48 महिने अशी थीम भाजप मांडण्यास इच्छूक आहे. वास्तविक भाजपशा सित राज्य असो की, केंद्र असो यांनी विकासाच्या बाबतीत विरोधकांच्या कारभाराशी आपली तुलना करणे चालवले आहे. मात्र त्यांना एवढे लक्षात येत नाही की, काँगे्रसच्या क ारभारावर सर्वसामान्य जनता नाराज होती, म्हणून त्यांच्याऐवजी तुम्हाला सत्तेवर बसवले आहे, ते तुलना करण्यासाठी नव्हे तर विकासासाठी. मात्र या विकासकामांचा रथ काही पुढे हलतांना दिसत नाही, की त्यांच्यावर चर्चा होतांना दिसून येत नाही. याउलट विरोधकांवर टीकेची झोड उठवण्यातच भाजप प्रथम प्राधान्य देतांना दिसून येत आहे. याउलट कर्नाटक मध्ये काँगे्रसची सत्ता असून, सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान काँगे्रससमोर आहे. कारण काँगे्रस हा राष्ट्रीय पक्ष असला, तरी तो आता केवळ चार राज्यात शिल्लक राहिला आहे. तर भाजप लोकसभेच्या निवडणूकांपासून एक-एक राज्य काबीत करत चौदा राज्यावर आपल्या पक्षांचा मुख्यमंत्री बसविण्यात यशस्वी झाले आहेत. तर उर्वरित पाच राज्यात मित्रपंक्षाच्या सहाय्याने सत्ता स्थापन केली आहे. तर याउलट काँगे्रस एक- एक राज्य गमावत चालले आहे. असे असतांना पक्षाला राष्ट्रीय कार्यक्रम देण्याची जवाबदारी काँगे्रसचे अध्यक्ष म्हणूपन राहुल गांधी यांच्यावर येऊन पडली आहे. नोटाबंदी व जीएसटी हे आता कालबाह्य मुद्दे झाले असून, त्यावर निवडणूका जिंकणे सोपे आहे, हा काँगे्रसचा भ्रम आहे. त्यामुळे काँगे्रसला आपल्या टीकेची भाषा बदलावी लागणार आहे. नवीन मुद्दे समोर आणावे लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपला देखील विकास आणि भ्रष्टाचार हे गुळगुळीत शब्दाऐेवंजी जनतेला प्रत्यक्षात विकास दाखवावा लागणार आहे. अन्यथा भाजपची पीछेहाट होण्यास वेळ लागणार नाही. आजमितीस देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी,  महागाई, दलित हत्याकांड, पारदर्शक प्रशासन आणि यापूर्वी झालेले विविध घोटाळे, याविषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगुन आहे. या विषयांवर बोलण्याऐवजी ते काँगे्रसवर टीका करून, त्यांच्या 48 वर्षांच्या कारभाराचे लक्तरे काढत आहे. मात्र विकासकांमावर, चार वर्षांतील त्यांच्या कामगिरीवर ते एकही शब्द बोलतांना दिसून येत नाही. येत्या एका वर्षांत लोकसभा निवडणूकांना सामोरे जायचे आहे. अशावेळेस प्रत्येक पक्षाला आपल्या गतकाळाचे पुण्य तारून नेईल, किंवा जनतेसमोर भाषणे केल्यामुळे, संपूर्ण परिसर पिंजून क ाढल्यामुळे मतदान मिळेल अशी शक्यता नाही. कारण जनतेला आश्‍वस्त करणारा नेता हवा आहे. त्यांना विकास हवा आहे. त्यामुळे कदाचित पुढील निवडणूकांमध्ये कदाचित वेगळे चित्र समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.