आई समजून घेण्यासाठी हवी दृरदृष्टी
“जिथे जिथे वृक्ष आहे, तिथे आहे छाया
तिथे आहेस तू आई जिथे आहे माया’’
या मंगेश पाडगावकरांच्या ओळी आईची महती स्पष्ट करतात. आपण सर्वजण आईचं प्रेम पाहत आलो आहे, अनुभवत आलो आहे, पण आईचं प्रेम मात्र तसुभरही कमी न होता शतपटीने वाढतच आहे. अशातच लोकवाड:मय गृह प्रकाशनाचे आई समजुन घेतांना हे पुस्तक वाचले. ह्या पुस्तकाचे लेखक ख्यातनाम पत्रकार, कवी, समीक्षक उत्तम कांबळे आहे. एका बैठकीत वाचून काढलेल्या या पुस्तकानं एक नवी दिशा दिली, तर काही प्रसंगानी डोळयांत टचकन पाणी आणलं. पुस्तकात कुठेही शब्दबंबाळपणा नाही. साध्या सोप्या भाषेत पण मनाला भिडणारं असं हे पुस्तक आहे.
उत्तम कांबळे यांनी आई समजुन घेतांना आपण सुप्रसिध्द लेखक, पत्रकार असलो तरी आत्मप्रौढी न मिरवता आई समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आईदेखील कधी-कधी चुकते; पण तिची अंतकरणातील भावना व दृष्टीकोन मात्र स्वच्छ असतो, हे लेखकाला कळले आहे. हाच त्यांचा प्रामाणिकपणा आई समजून घेतांना उपयोगी येतो. लेखकांचे मनोगतातील एक वाक्य काळजाला भिडते. ‘शिकू नको, चल माझ्याबरोबर रोजालाच...’असं एकदा जरी आणि चुकून जरी तिने म्हटलं असतं तरी माझं काय झालं असतं याची कल्पनाच करवत नाही. आपण नोकरी लागली की मर्यादित विचार करतो. स्वत:ला बंदिस्त करून घेतो. स्वत:च्या व्यापात गुरफुटलो असतो. पण याउलट आई कामाच्या व्यापात कधीच संघर्षात कधीच मर्यादित होत नाही. ती आपल्या मुलांवर अमर्याद कधीही न संपणारं, कधीही न आटणारं प्रेम करते. त्याचप्रमाणे लेखकांची आई कामाचा व्याप असो अथवा इतर दु:ख ती कधीच मुलांना नातेवाईकांना विसरत नाही. ती म्हणते ‘माणसांन माणूसघाणं होऊन चालत नाही. माणसानं माणसांशर बोललं पाहिजे. आपल्या माणसाकडं गेल पाहिजे, भेटलं पाहिजे, पण पुस्तकाने शिक्षणाने माणूस दूर चालला आहे.
आज आपल्याकडे आर्थिक सुबत्ता आल्यामुळे आपण चंगळवादाकडे वळलो आहोत, पण लेखकांच्या आईचं बचतीचं सुत्र अफाट आहे. ते आजच्या घडीला देखील खूप काही शिकवून जाते. ते साध्या साध्या प्रसंगातून लक्षात येते. मग ते इनलँडऐवजी साधं पत्र पाठवलं तर तर त्या उरणार्या पंधरा पैशांत आठवडाभरांच मीठ येते, किंवा बसनं प्रवास न करता पायी प्रवास करणारी अक्का किती सुक्ष्म विचार करते ते लक्षात येते. रोजच्या जगण्यासाठी, खाण्यासाठी श्रम करणारी पण पेन्शन न वापरणारी अक्का भविष्याची उत्तम जाण असलेली ‘माय’ वाटते. लेखकांचे मित्र त्यांच्या आईला साडया घेतात , त्यावेळेस लेखक म्हणतात ‘तु एवढया साडया कशाला घेते? त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून लेखक व वाचकदेखील सुन्न होतो. उपवासाच्या दिवशी साबूदाण्यासाठी दर आठवडयाला घेतलेले 50 रूपये असतील किंवा क्षयरोग झाल्यावर मुलगी, सून विशेषत: नातवंडापासून दूर-दूर राहणारी अक्का आम्हा वाचकांच्या डोळयांत पाणी आणते. तिचा भाबडेपणा या प्रसंगातून इतक्या सहजपणे येतो की, तो थेट काळजात रूतुन बसतो.
‘शेणातील कीडा शेणात राहत नाही’ हे अक्कांच वाक्य लेखकाला एक प्रकारची उर्मी देते. जगण्याचं बळ देत. या साध्या साध्या वाक्यातून तत्वज्ञानाचा पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. लेखकाकडच्या सर्व सोयी सुविधांचा त्याग करून गावाकडेच राहण्याचा कल असणारी अक्का स्वत:च्या विश्वात रमणारी वाटते.
शिक्षणासाठी, नोकरीसाठी शहरात आल्यावर आपण गावाकडच्या आई-वडिलांना विसरून जातो; अन्यथा परिवर्तनाच्या आधुनिकतेच्या नावाखाली त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या बोलण्यावर इथंवर जेवण करण्याच्या पध्दतीपर्यंत आपण त्यांना बोलतो. अपमानास्पद वागवतो. पण त्यांची जडणघडण समजून त्यांना सावरण्याचा आपण कधी प्रयत्न करणार आहोत? पण तो प्रयत्न उत्तम कांबळे सरांनी ‘आई समजून घेतांना’ या पुस्तकात केला. कारण आईची दृष्टी त्यांना लाभली, त्यांनी ती मिळवली. त्यामुळे त्यांच्या सच्चेपणाला, प्रामाणिकपणाला लाख-लाख धन्यवाद!
बाळकुणाल अहिरे कार्यकारी संपादक
पुस्तकाचे नाव : आई समजून घेतांना
लेखक : उत्तम कांबळे
प्रकाशक : लोकवाड:मय गृह मुंबई
पृष्ठे : 130
किंमत : 150 रूपये