भुजबळ यांना झेड सुरक्षा देण्याची माळी सेवा समितीची मागणी
नाशिक, दि. 12, मे - ओ.बी.सी समाजाचे राष्ट्रीय नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आ. जयंत जाधव यांनी केलेल्या मागणीचा विचार करून झेड सुरक्षा द्या अशी मागणी माळी समाज सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, भुजबळ यांचा मागच्या आठवड्यात जमीन मंजूर झाला आणि देशांत व राज्यांत सहानुभूतीची मोठी लाट उसळली असून या लाटेत सत्ता परिवर्तनाची क्षमता आहे.अनेक राजकीय गणिते त्यांच्या जमिनानंतर राजकारणात मांडली जात असून देशात व महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहे.
भुजबळ प्रकृतीने त्रस्त आहे.त्यात सहनुभूतीमुळे वाढणार्या गर्दीमुळे कळतनकळत धोका निर्माण होऊ शकतो अशा या कठीण प्रसंगातून छगन भुजबळ जात असतांना त्यांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये याची खबरदारी शासनाने घ्यावी.कारण सुरूवातीपासून चौकशीत संपूर्ण सहकार्य असताना देखील 26 महिने महिने जमीन नाकारला गेला. सर्वोच्च न्यायालयाचा कलम 45 हटविल्यानंतर नंतर देखील सर्वोच्च न्यायालयापर्यंत जा मिनासाठी लढाई करावी लागली म्हणजेच हा राजकीय सूड उगवण्याचा प्रकार आहे.त्यामुळे जमीन मंजूर झाल्यानंतर अत्यंत उत्साहाने भुजबळांचे स्वागत सुरु आहे.देशभरातील व राज्यातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची भुजबळांच्या भेटीला रीघ लागली आहे.एवढी प्रचंड सहानुभूती बघता राजकीय शक्तींकडून पुन्हा सूड उगवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
तसेच छगन भुजबळ महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशांत ओ.बी.सीं चे नेतृत्व करतात. ते माळी समाजाचे प्रमुख नेते आहे त्यामुळे आमदार जयंत जाधव यांनी केलेल्या मागणीच्या आधारे त्वरित नियमाप्रमाणे सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी केली आहे.