Breaking News

वांबोरी शहरात महात्मादिन उत्साहात

राहुरी : येथील संत सावता माळी युवक संघ आणि अानंदऋषि ब्लड बॅंक यांच्या सयुक्त विद्यमाने वांबोरी येथे आज {दि. ११} महात्मादिन मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त रक्तदानशिबिराचे अायोजन करण्यात अाले होते.
दि. ११ मे १८८८ रोजी ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहाद्दूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेच्यावतीने महात्मा ही पदवी देण्यात आली. त्याप्रित्यर्थ आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले व सावित्री फुले यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी गोरक्षनाथ ढवळे, सचिन मेहेत्रे, अाबा पाटील, रोहित टेंभे, अशोक तुपे आदींसह ईश्वर पुंड, सुनिल शिंदे, दिपक साखरे, दत्तात्रय तरवडे, मनोज साळवे, योगेश राऊत, ओंकार भालके, श्रीकांत लगे, गणेश होले, गोरख होले, सचिन सत्रे, संतोष शिंदे, संतोष सत्रे, भरत सत्रे, गोविंद तुपे, तुषार सत्रे, संतोष विधाटे, गोरक्षनाथ चव्हाण, दिनेश कुसमुडे, शेखर दुधाडे, दिपक पुंड, रामकिसन कुह्रे, विजय शिंदे, निलेश येळजाळे, गणेश साखरे, मयुर गडाख आदी उपस्थित होते.