सर्वात कमी जागा मिळूनही कर्नाटकात जेडीएसचा मुख्यमंत्री?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. सर्वात कमी जागा मिळालेला जनता दल सेक्युलर अर्थात जेडीएस या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. कारण दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसने तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला पाठिंबा जाहीर केला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने थेट जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. त्याबाबत स्वत: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या जेडीएसचे सर्वेसर्वा आणि कुमारस्वामी यांचे वडील एच डी देवेगौडा यांच्याशी बातचीत करणार आहेत.