नगर । प्रतिनिधी - जिल्ह्यात आगामी सन 2019 मध्ये होणार्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मतदार याद्या अद्यावत, मतदार नोंदणी मोहिमेची सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील मतदार संघाच्या बीएलओंसाठी विविध ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाला गैरहजर राहिलेल्या बीएलोंवर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक विभागाकडून देण्यात आले होते. याबाबत आज संबंधित तहसील कार्यालयात गैरहजरीचा खुलासा करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती