महाराष्ट्रात फार काळ मुख्यमंत्री राहता येत नाही, हा इतिहास - देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रात फार काळ मुख्यमंत्री राहता येत नाही, हा इतिहास आहे असं वक्तव्य खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली कोंडी आणि शिवसेनेसोबत युती टिकवण्यासाठी सुरू असलेली कसरत अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सूचक विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईतील विक्रोळीमध्ये सुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते