Breaking News

महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा वृद्धींगत करुयात - दीपक केसरकर


सिंधुदुर्ग, दि. 02, मे - महाराष्ट्राची गैरवशाली परंपरा वृद्धींगत करुयात असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 व्या वर्धापन दिना निमित्त सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 107 जणांनी प्राणांची आहुती दिली. त्यांना आजच्या दिवशी अभिवादन करुयात असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले. आपणा सर्वांच्या सहकार्यातून आपल्या जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा अधिक वृध्दींगत करण्याचा आज संकल्प करुया. या निमित्ताने एका लक्षणीय घटनेची मी नेहमी आठवण करतो ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची नि र्मिती 1 मे 1981 रोजी बरोबर 37 वर्षांपूर्वी झाली. आज सिंधुदुर्ग स्वच्छता, पर्यंटन, शिक्षण यासारख्या अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र राज्याला दिशादर्शक अशी कामे करत आहे असे ते म्हणाले.

यावेळी पोलीस, महिला पोलीस दल, गृहरक्षक दल, महिला गृहरक्षक दल, वन विभाग यांनी शानदार संचलन केले. तसेच वज्र वाहन, श्‍वान पथक, दंगल नियंत्रण पथक व जलद प्रतिदास पथकानेही संचलनामध्ये सहभाग घेतला.