Breaking News

त्या 27 गावाांचा महापालिकेत समावेश होवुनही मुलभूत, पायाभधांची समस्या कायम

डोंबिवली, दि. 02, मे - ती 27 गावे कल्याण डोंबिवली महापालिकेत सामाविष्ट होवून 30 महिन्याचा कालावधी झाला. परंतु आजही मुलभूत आणि पायाभूत सुविधांची समस्या तशीच आहे. महापा लिकेत गेल्यामुळे आपली गावे समस्यामुक्त होतील अशा भाबड्या कल्पना त्यावेळी मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तेथील मतदारांनी मनाशी बाळगल्या होत्या. पुढारी आणि विद्यमान राजकीय प्रतिनिधींनी अनेक आश्‍वासने दिली होती. आज ती आश्‍वासने फक्त आश्‍वासनेच राहिली असल्याने आता आम्हाला यातून मुक्त करा अशी जाहीर मागणी होत आहे. परंतु पुढारी आणि लोक प्रतिनिधी यांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे त्या 27 गावांचा विकास होण्यास अडसर निर्माण होत असून विकास कामांना ब्रेक लागत आहे. हा पीळ कसा सुटणार हाच मोठा प्रश्‍न असून त्या 27 गावांचे नक्की काय होणार हे काळच ठरवणार आहे.

27 गावांचा विचार केला तर रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण अशा प्रमुख समस्यांना तेथील ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी ग्रामपंचायत माध्यमातून कारभार चालत होता. मुख्य म्हणजे विकसित शहरांच्या परिघात ही ती 27 गावे गुंफलेली असल्याने लोकसंख्या वाढीला चालना मिळाली. याचा फायदा विकासकांनी घेतला. प्रत्येक गावागावात संकुले उभी राहिली परिणामी गरजा वाढल्या आणि तेथूनच अनेक समस्यांचा उदय झाला.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामकाज होत असले तरी विकास खुंटला होता. अशा परिस्थितीत गावांचा मोठ्या प्रमाणावर विकास होण्यासाठी अखेर ती 27 गांवे कल्याण डोंबिवली महानगर पालिके त समाविष्ट झाली पण पळसाला पाने तीनच अशी अवस्था आज त्या गावाची आहे.

अनेक ठिकाणी पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. या गावांच्या पाणीपुरवठ्याचे दुखणे जुने असून त्याच्यावर तात्पुरता इलाज केला जात आहे. बैठका घेतल्या आणि आश्‍वासने दिली तरी त्यात फारशी सुधारणा होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. अमृत योजनेतून कामे पूर्ण होतील असे जरी सांगण्यात येत असले तरी त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मुख्य म्हणजे ग्रामपंचायत क ाळात टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या अपुर्‍या आहेत. जरी या भागाला जादा दाबाने पाणीपुरवठा केला तर वाहिन्या फुटून पाणी पुरवठ्याची भीषण समस्या निर्माण होईल.
कचर्‍याचा प्रश्‍न आरोग्याशी निगडीत आहे. पूर्वी ग्रामपंचायत माध्यमातून कचर्‍याची विल्हेवाट लावली जात होती. आता सफाई कामगार टंचाई आणि वाहतूक समस्याचे कारण सांगून प्रत्यक्ष कामाला बगल दिल्याची अनेक उदाहणारे दिली जातात. 

घाणीचे साम्राज्य आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव ही एक भयानक समस्या निर्माण होत आहे. पालिका प्रशासनाचे आरोग्य विषयक धोरण ग्रामीण विभागाला दुर्लक्षित असून लोकप्रतिनिधी प्रशासनाबरोबर नेहमीच दोन हात करीत आहेत. ती 27 गावे आता पालिकेत नको म्हणून संघर्षही होता आहे. मात्र 27 गावातील पुढार्‍यांची आणि लोकप्र तिनिधींची भूमिका वेगवेगळी असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य जनतेची मते कोणीही विचारातच घेत नाही. या राजकारणात मात्र 27 गावांच्या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. कारण पुढारी आणि लोकप्रतिनिधींच्या परस्पर विरोधी भूमिकामुळे विकासाला ब्रेक लागत असून पुढील काळच आता त्या 27 गावाचे भवितव्य ठरविणार आहे.