Breaking News

वाळू माफियांचा ट्रॅक्टर ट्रॉली पोलिस हवालदाराच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न


सातारा, दि. 2, मे पळशी, ता. माण येथील माणगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणार्यांना प्रतिबंध केला असता शासकीय कामात अडधळा आणत आठ वाळू माफियांनी ट्रॅक्टर ट्रॉली म्हसवड पोलिस ठाण्यातील पेट्रोलिंग करणार्या पोलिस कॉन्सटेबल यांच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून या आठ पैकी पाच संशयित आरोपींना अटक केली असून तीन जण पसार झाले आहेत.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, म्हसवड पोलिस ठाण्यातील सपोनि मालोजीराव देशमूख यांच्या आदेशान्वये स पो.फौ पायमल जाधव फडतरे कुदळे व सोरटे तसेच पो.हवलदार खाडे चव्हाण हे सर्वजण अवैध वाळू वहातुकीवर कारवाई कारण्यासाठी पळशी, ता.माण गावच्या हद्दीत माणगंगा नदीपात्रा शेजारी गस्त घालत असताना एक इसम नामे रामचंद्र खाडे संशयीत रित्या फिरत असताना त्याला विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यास विश्‍वासात घेऊन अधिक माहिती विचारली असता नदीपात्रामध्ये सुखदेव नाकडे विकास नाकाडे सागर माने अविनाश माने सागर जाधव हे सर्व रा.पळशी हे नदी पात्रातील वाळू उपसून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरण्याचे काम करत होते.यावेळी पोलिस त्याला घेऊन नदी पात्रात गेली असता पोलिसांची चाहूल लागल्याने नदीपात्रात वाळू भरत असलेल्या इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिस पथकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतू एका ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर पो लिस कॉन्सटेबल निलेश कुदळे यांच्या अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.व अंधाराचा फायदा घेऊन खाकीवर्दीत असणार्या कर्मचार्याना काहीनी धक्काबुक्की करून ट्रॅक्टर ट्रॉलीतील सात हजार रूपये किमतीच्या दोन ब्रास वाळूसह तिघे जणांनी पलायन केले.

सदर घटनेची फिर्याद पोलिस कॉन्सटेबल निलेश कुदळे यांनी महसवड पोलिसात दिली असून या घटणेतील पाच संशयीत आरोप सुखदेव नाकाडे (वय 42), लक्ष्मण खाडे (वय 27) अविनाश माने (वय 25), रामचंद्र खाडे (वय 30), चंद्रहार (गंडा) खाडे (वय 38) या पाच संशयीतांना अटक केली असून विकास खाडे सागर माने सागर जाधव हे तिन जण फरार आहेत.