सिद्धरामय्यांचा बदामीत विजय, चामुंडेश्वरीत पराभव
काँग्रेसचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा जागेवर विजय झाला आहे. मात्र, म्हैसूर येथील चामुंडेश्वरी विधानसभा जागेवर त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, सिद्धरामय्या यांचा बदामी विधानसभा जागेवर विजय झाला आहे. येथे त्यांच्यासमोर भाजपचे बी. श्रीरामुलू निवडणूक रिंगणात होते. श्रीरामुलू यांच्या तुलनेत त्यांना केवळ 1 हजार 696 मतेच अधिक मिळाली आहेत. तर, म्हैसुरू येथील चामुंडेश्वरी येथे त्यांचा तब्बल 36 हजार 42 मतांनी जबरदस्त पराभव झाला.