येडियुरप्पा, कुमारस्वामींचा सत्तास्थापनेचा दावा
कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवान हालचाली घडत आहेत. राज्यपालांची भेट घेण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. सर्वाधिक संख्याबळ पाठीशी असल्याचा दावा करत भाजप नेते येडियुरप्पा यांनी राज्यपालांच्या भेट घेतली. सत्तास्थापनेसाठी मुदत मागितली आहे. तर दुसरीकडे जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली आहे.त्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तृळाचे लक्ष लागले आहे.