ईव्हीएमचा संशय दूर करा : उद्धव ठाकरे
एकदाच या देशात बॅलेट पेपरने मतदान घ्या, आणि ईव्हीएमचा संशय दूर करा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. कर्नाटक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा विजय, असो अशी टीका ट्विटरवरून केली. विरोधकदेखील ही ईव्हीएमची किमया आहे, अशी टीका करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीदेखील एकदाच या देशात बॅलेट पेपरने मतदान घ्या, असा सल्ला देत भाजपला टोला हाणला.