भोयरे गांगर्डात जलयुक्त योजनेच्या कामाचा शुभारंभ
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने गावोगावी प्रभाविपणे कामे सुरू आहेत. पावसाचा पडणारा थेंब त्या जागीच मुरल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होणार असून तालुका लवकरच टँकरमुक्त होणार असल्याचे प्रतिपादन आ. विजय औटी यांनी केले. पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथे शनिवारी जलयुक्त शिवार योजनेतून 1 कोटी 32 लाख 40 हजार रुपये खर्च करून कंपार्टमेंट बंडींग, समतर चर, सिमेंट बंधारे दुरुस्ती, माती नाले दुरुस्ती, वनतळे दुरुस्ती, पाझर तलाव दुरूस्ती, गिबियन बंधारे आदी कामाचे भूमिपूजन आ. औटी यांचेहस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते हे होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, विकास रोहकले, सरपंच भाऊसाहेब भोगाडे, युवराज पाटील, आप्पासाहेब देशमुख, सुरेश बोरूडे, उत्तम पठारे, गोरख काळे, सुभाष दिवटे, विठ्ठल पोटघन, अरूण कळमकर, अशोक पवार, भाऊसाहेब भोगाडे, माणिक पवार, दादासाहेब रसाळ, सुभाष भोगाडे, शशिकांत पवार, प्रविण गायकवाड, सुंदराबाई कामठे, संगिता सातपुते, विठ्ठल भोगाडे, अर्जुन डोंगरे, अशोक रसाळ, श्रीराम लगड, प्रमोद रसाळ, मधुकर लगड, बाळासाहेब लगड, सुदाम सातपुते, रामभाऊ भोगाडे, संजय भोगाडे आदी यावेळी उपस्थित होते. पुढे बोलतांना आ.औटी म्हणाले की, गेली 10 वर्षात रस्ते, पाणी यासह प्रत्येक गावात विकास गंगा पोहोचवली, कडूस-भोयरे गांगर्डा-रुईछत्रपती ते वाळवणे 11 कि.मी. रस्त्यासाठी 5 कोटी 28 लाखांचा निधी उपलब्ध केल्याने शेतकर्यांनी उत्पादीत केलेला माल पुणे, शिरूर, नगर, पारनेर सारख्या बाजारपेठेत नेण्यासाठी वेळ व खर्चाची बचत होणार आहे, दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम मार्गी लावले. यावेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भोगाडे यांनी, तर आभार सरपंच भाऊसाहेब भोगाडे यांनी मानले.