Breaking News

भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडुन पारनेर तालुक्यात दुध आंदोलन सुरूच!

दूध दरवाढीसाठी 3 मे पासुन सुरू केलेले दुध वाटप आंदोलन भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडुन तालुक्यामध्ये तीव्र करण्यात येत असुन शनिवारी खडवाडी येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, अनिल देठे, कीरण वाबळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या धोरणांचा निषेध करत ग्रामस्थांना मोफत दुध वाटप सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 

1 जूनच्या संपा दरम्यान राज्य सरकारने दिलेले प्रतिलीटर 27.00 रू दराचे आश्‍वासन राज्यातील सहकारी दुधसंघासह, खासगी दुधसंघांनीही पाळलेले नसून उलट दुधदरात प्रतिलीटर 10 रूपयांची घसरण झालेली असल्याने, राज्यातील दुधउत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर दुध उत्पादक संघर्ष समितीने मोफत दुध वाटप सप्ताह सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी खडकवाडी येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेने सामुहिकरित्या दुध वाटप सत्याग्रह आंदोलन केले.
यावेळी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष अशोक आंधळे, जिल्हा प्रवक्ते संतोष हांडे, तालुकाउपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गागरे, गणेश चौधरी, सोपान वाडेकर, रवींद्र ढोकळे, राजु रोकडे, सबाजी गागरे, शिवाजी रोकडे, डॉ. रावसाहेब आग्रे, शुभम खामकर, सुभाष वाबळे, संतोष शिंदे, अशोक खामकर, सुभाष ढोकळे, विश्‍वनाथ ढोकळे, आबा नवले, बन्सी घेमुड, धनंजय ढोकळे, सुरेश गागरे, संतोष पानसरे, किसन गागरे, बबन ढोकळे, बी.डी.ढोकळे, रामदास नवले, रघुनाथ ढोकळे, अंबादास नवले, सिताराम गागरे, विकास रोकडे यांसह आदी शेतकरी उपस्थित होते. 

दुधाची नासाडी करण्यापेक्षा शांततेच्या, लोकशाही मार्गानेच आंदोलन तीव्र करून राज्य सरकारला दखल घेण्यास भाग पाडू.
- अनिल देठे, राज्य प्रवक्ते भूमिपुत्र शेतकरी संघटना