Breaking News

सोलापूर-येडशी महामार्गाचे चौपदरीकरण


सोलापूर, दि. 02, मे - सोलापूर-धुळे महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. यापैकी सोलापूर-येडशी पर्यंतचा टप्पा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतला आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण चकाचक झाले आहे. 

मात्र रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या झाडांच्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे रस्त्याची रुंदी वाढली आणि रस्त्याची रुंदी वाढवताना रस्त्याच्या कडेला असलेली झाडे काढावी लागली. मात्र त्याचवेळी नव्याने झाडे लावण्याची अट शासनाने घालण्यात आली. ही पध्दत सर्वत्र असतेच. त्यामुळे सोलापूर-येडशी महामार्गाच्या चौपदरीकरण काम पूर्णत्वास येत असताना आयआरबी कंपनीने शंभर किलोमीटरच्या अंतरावर आजतागायत आठ हजार झाडे लावली. 17800 झाडे लावण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. जागा उपलब्ध होताच उर्वरित झाडे लावण्यात येणार आहे.