Breaking News

शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी प्रशासनाधिका-यांकडे मागणी


सोलापूर, दि. 02, मे - एकाच शाळेत पाच ते दहा वर्षापासून काही शिक्षक सेवा बजावत आहेत, जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या शासन निर्णयानुसार 5 टक्के व विनंतीनुसार 5 टक्के बदल्या केल्या जातात. मात्र पालिक शाळांमध्ये मागील दोन वर्षापासून बदलीची कारवाई नाही. तरी यावर कारवाई करण्याची मागणी मागासवर्गीय शिक्षक संघटनेने केली आहे. 

शाळांतील रिक्त असलेल्या विषय शिक्षक या जागांवर सेवा ज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती मिळावी तसेच शासन नियमाप्रमाणे रिक्तपदी पदवीधर शिक्षक व विषयक शिक्षक बदल्या कराव्यात,त्या बदल्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कराव्यात, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस अमोल भोसले यांनी दिली. त्यावेळी प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांनी ग्राम विकास खात्याच्या निर्णयानुसार व पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जाणार आहेत. असे सांगितले. निवेदन देताना अध्यक्ष नागेश गोसावी, अझर पंझेवाले, अमोल भोसले, कल्लप्पा कुंभार उपस्थित होते.