Breaking News

पल्लवी टाकसाळ सेट परीक्षा उत्तीर्ण

श्रीरामपूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणार्‍या सहाय्‍यक प्राध्यापक पदासाठीच्या ( सेट ) राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत पल्लवी शिवाजी टाकसाळ या वाणिज्य विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांचे वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात झाले. त्या वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत बँकिंग आणि फायनान्स विषयात पुणे विद्यापीठात प्रथम आल्या होत्या. टाकसाळ यांना बेलापूर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पवार बी. आर, प्रा. पी. डी. देशपांडे, प्रा. माने, प्राध्यापिका रुपाली उंडे आदींचे मार्गदर्शन लाभले.