Breaking News

मार्गदर्शन शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद : वाबळे

शिर्डी / प्रतिनिधी मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून मुलींना मिळणारे मार्गदर्शन हे मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. त्याचे फायदे हे दूरगामी आहेत. यामुळे जीवनातील विविध प्रकारच्या समस्यांवर मात करण्याची शक्ती मुलींना मिळणार आहे. त्या हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन रुईच्या सरपंच वाबळे केले. राहाता पंचायत समितीच्या माध्यमातून व डॉ. सुजय विखे यांच्या पुढाकारातून रुई व सावळीविहीर गणातील किशोरवयीन मुलींसाठी आहार आरोग्य व्यावसायिक कौशल्य जीवनकौशल्य, स्त्री-विषयक कायदे मुलींचे आरोग्य मासिकपाळी व गैरसमज याबाबत सामाजिक बांधीलकीच्या दूरदृष्ठीकोनातून ग्रामीण भागातील मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. मिळाले पाहिजे. यावेळी सभापती हिराबाई कातोरे, पं. स. सदस्य ओमेश जपे, ग्रामपंचायत सदस्य योगेश जपे, संजय तुरकणे, योगेश ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी बबनराव सांगळे, पर्यवेक्षिका उमा खोले, मंगला राजळे आदी उपस्थित होते. यावेळी रुई व सावळीविहीर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोठे परिश्रम घेतले यावेळी उपस्थितांचे आभार मंगला राजळे यांनी मानले.