Breaking News

विजय मल्ल्या याची भारतातील मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयाने नव्याने आदेश दिले


नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज थकवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याची भारतातील मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयाने नव्याने आदेश दिले आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणीच्या खटल्यात मल्ल्याने वारंवार समन्सला प्रतिसाद न दिल्याने त्याला 'फरार गुन्हेगार' घोषित करण्यात आले आहे. या खटल्यात परकीय चलन नियमन कायद्याचे (फेरा) उल्लंघन केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत यांच्या न्यायासनासमोर या संबंधीच्या खटल्याची मंगळवारी सुनावणी झाली. त्याप्रसंगी मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याबाबत संबंधित तपास यंत्रणांनी आपल्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, असे ईडीच्या वतीने बाजू मांडणारे सरकारी वकील एन. के. मट्टा यांनी न्यायालयाला सांगितले.