४०० किलोंपेक्षा अधिक वजनाचा गांजा, मादक द्रव्य जप्त
चेन्नई : आंध्र प्रदेशातून आणण्यात येत असलेला ४०० किलोंपेक्षा अधिक वजनाचा गांजा, मादक द्रव्य नियंत्रण विभाग एनसीबीने जप्त केले. विशेष माहितीआधारे मादक द्रव्य विभागाने माधवरम टोल गेटजवळ एका ट्रॅकला अडवले असता ट्रॅकमध्ये निर्बंध घातलेला ४२५ किलो वजनाचा गांजा १४ प्लॉस्टिकच्या पाकिटांमध्ये भरलेला आढळला. या प्रकरणी दोन इसमांवर एनडीसीपीएस अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.