Breaking News

पत्नी व मुलीला जिवंत पेटवून देत पतीनं स्वतः केली रेल्वेखाली आत्महत्या.


पत्नी व मुलीला जिवंत पेटवून देत पतीनं स्वतः रेल्वेखाली येत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील अमळनेर येथे घडली. अमळनेर येथील प्रताप मिल कम्पाऊंड परिसरामधील हा धक्कादायक प्रकार आहे. सरिता अनिल खैरनार (वय ३३ वर्ष) या महिलेला तिचा पती अनिल खैरनारनं पेट्रोल ओतून पेटवलं. या घटनेत सरिता आणि त्यांची पाच वर्षांची चिमुकली तनुजा गंभीररित्या जखमी झाल्या. यानंतर स्वतः अनिल खैरनारने मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली.