सट्टा बाजारात दाऊद इब्राहिम सक्रिय
मुंबई - भारतातील सट्टा बाजारातील नामचीन बुकी म्हणून ओळखला जाणारा सोनू योगेंद्र जालान उर्फ सोनू मालाड यास ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. पोलीस तपासात सट्टा बाजारात दाऊद सक्रिय असल्याचे सोनू मालाड याने कबूल केले आहे. मुंबईतील सर्वात मोठा बुकी सोनू जालान याचे सट्टा बाजारात फक्त देशातच नाही तर अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका आणि पाकिस्तानातही ग्राहक असल्याच पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सोनू जालान याला याआगोदरही क्रिकेट सट्टा संदर्भात अटक झालेली होती.