Breaking News

वीज कंपनीचे अर्ज खाजगीत छापून ग्राहकांची लुट भद्रकालीतील व्यावसायिकाचा धक्कादायक प्रकार

संदीपकुमार ब्रह्मेचा नाशिक : वीज मीटर नावावर करायचे असो किंवा नवीन वीज जोडणीचे अर्ज असो सर्वच महावितरण कंपनीचे अर्ज खाजगीत छापून बिनदिक्कत पणे विक्री करत असल्याचा धक्क ादायक प्रकार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे हा सर्व प्रकार भद्रकाली उप विभागाच्या कार्यालयासमोर होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

ग्राहकांना नवीन वीज मीटर, वीज बील नावावर करायचे असो किंवा जादा विजेची मागणी मागणी करायची असो सर्व प्रकारचे फॉर्म अर्थात अर्ज वीज वितरण कंपनी च्या क ार्यालयात मिळत नाही तसे अर्ज वीज वितरण कंपनीने उपलब्ध नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे सगळेच अर्ज भद्रकाली उप विभागाच्या कार्यालयासमोर एका झेरॉक्स सेंटरच्या दुक ानात बिनधास्त पणे विक्री केले जात असून देखील वीज वितरण कंपनीकडे अर्ज विक्री करण्याची परवानगी घेतली आहे काय ? किंवा ह्या व्यवसायिकास अर्ज विक्री परवानगी दिली आहे काय? असा सवाल सर्व सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे.
तसेच सर्वच ग्राहक वीज वितरण कंपनीच्या बाबतीतले अर्ज दुसरीकडे कुठेच मिळत नसून केवळ भद्रकालीत एकच ठिकाणी मिळत असल्याने फॉर्म ची किंमत देखील बारा रुपये ठेवण्यात आली आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांची दिवसाढवळ्या लुट होत आहे .मात्र, ग्राहकांना हे अर्ज वीज वितरण कंपनीच्या कोणत्याच कार्यालयात मिळत नसतांना ग्राहक गरजे पोटी तक्रार देखील करत नाहीत त्यामुळे ह्या व्यवसायीकाचे मोठे फावले आहे.
वीज वितरण कंपनीचे सर्वच फॉर्म वेबसाईट वर उपलब्ध असले तरी प्रत्यक्ष कार्यालयात उपलब्ध का नाहीत ? वीज वितरण कंपनीने ग्राहकांना लागणारे सर्व अर्ज सरकारी दरात उपलब्ध करून देणे हे कर्तव्य नाही का ? असा सवाल सर्व सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत


प्रतिक्रिया
ग्राहकांनी मागणी केल्याप्रमाणे वीज वितरण कंपनीने कोणत्याही परिस्थितीत अर्ज उपलब्ध करुन् देण्याची जबाबदारी आहे,तसे न करता जवळच्या झेरॉक्स सेंटरच्या अथवा लागे बांधे असलेल्या टपरीवर फॉर्म्स घेण्याबबत सल्ला दिला जातो, या पेक्षा ही विनोदाचा भाग म्हणजे ग्रामीण भागातील ग्राहकांना वेबसाईट वरुन फॉर्म्स डाऊनलोड करुन घेण्याचा सल्ला दिला जातो, हे सर्व बेजबाबदार व बेशिस्त पणाचे वर्तन आहे,कोणत्याही परिस्थितीत वीज वितरण कंपनीने सर्व फॉर्म्स मागणी केल्याप्रमाणे उपलब्ध करुन दिलेच पाहिजेत ही मागणी ग्राहक संघटना खुप वर्षापासून मांडत आहे.नविन आलेल्या मुख्य अभियंता यांनी लक्ष घातले तर सर्व ग्राहकांची सोय होईल.
श्रीकांत खाडिलकर
ग्राहक सरंक्षण संघटना पदाधिकारी
फोटो आवश्यक


वीज वितरण कंपनीचे अर्ज खाजगीरित्या विकले जात असल्याची माहीती नसून , या संदर्भात माहीती घेऊन कारवाई केली जाईल
जयसिंग दूधभाते
जनसंपर्क अधिकारी
वीज वितरण कंपनी
--------------------------------