Breaking News

शेतकर्‍याच्या उपचारासाठी आ. राजळे यांचे मदतीने मुख्यमंत्री सहाय्य निधी

तालुक्यातील भाविनिमगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील असणारे दादासाहेब कारभारी गाढे यांना आ. मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 75 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात आले. सदर रक्कम रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे पत्र दादासाहेब गाढे यांना प्राप्त झाले. या सहकार्‍याबद्दल भाविनिमगाव येथील गावकर्‍यांनी आ. मोनिका राजळे यांचे मनापासून आभार मानले. यावेळी सुरेश थोरात, अनंत व्यवहारे, राम मुंगसे, अशोक गाढे, व समस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.