Breaking News

सा. कार्यकर्ते संजय कोठारी यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

जामखेड / ता. प्रतिनिधी ।जवळा विकास समूह यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सा. कार्यकर्ते कोठारी गेली 25 वर्षांपासून समाज सेवा करत आहेत. यामध्ये अपघातग्रस्तांना त्वरित मदत,जखमींना आपल्या रुग्णवाहिकेत आणून हजारो जखमींना वाचविण्याचे काम संजय कोठारी यांनी केले आहे. तालुक्यात दुष्काळात उन्हाळ्यात पाणपोई तसेच मोकाट जनावरांना पाणी उपलब्ध करून, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश वाटप, बेवारस मृतदेह, अंत्यविधी संपूर्ण खर्च करणे, वृक्षारोपण, दिवाळी निमित्त कैद्यांना मिठाई वाटप, भारुडाद्वारे एड्स जनजागृती करणे, थंडीच्या दिवसात वृध्दांना स्वेटर वाटप, अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचाराविरूद्ध सतत संघर्ष असे सामाजिक कार्य करत असल्याने अशोक पठाडे, सावता हजारे, किरण हजारे आदींनी जवळा विकास समुहामार्फत हा पुरस्कार प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी सभापती सुभाष आव्हड, शिवसेना तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, अजिनाथ हजारे, समीर शेख, प्रदिप पाटील, रमेश आजबे, राजेंद्र राऊत, प्रशांत शिंदे, लियाकत शेख, गणेश भळगट, अनिल फिरोदिया, अमोल गिरे, दयानंद कथले, अमोल हजारे, दिनेश हजारे, विक्रांत मंडलेचा, आनंद जैन आदी उपस्थित होते