मेट्रोसाठी 329 वृक्षांची तोडणी करणार.
पुणे शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणाया 329 वृक्षांची तोडणी करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यावर येत्या आठ दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. तोडलेल्या अनेक वृक्षांची दुसड्ढया जागी लागवड करण्यात येणार आहे. महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक झाली.
अध्यक्षस्थानी आयुक्त सौरभ राव होते. मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणा-या 329 वृक्षांची तोडणी करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यावर सविस्तर चर्चा करुन येत्या आठ दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे शहरात पावसाळयात तब्बल 35 हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्यण वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शहरात आरक्षित जागेसोबतच रस्ते बांधण्यात आल्यानंतर उपलब्ध असलेल्या जागी वृक्षलागवड होणार आहे. पुणेकरांनी वृक्षलागवडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापा लिका करणार आहे.