Breaking News

शिवार फेरीद्वारे सिंचनाबाबत आढावा


 अडावद/प्रतिनिधी। 4 -  शासनाच्या परिपत्रकानुसार अडावद येथे महसूल विभाग, कृषी विभाग, वनविभाग, सिंचन विभाग व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिवार फेरी काढून सिंचनाबाबतचा आढावा घेण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार  डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अडावद शिवार फेरी काढण्यात आली. अडावद-उनपदेव  शिवारातील माती बांध, नाला बांध, सिमेंट बंधारे व पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. 
या वेळी तालुका कृषी अधिकारी पी.बी.पाटील, कर्जाणा वनक्षेत्रपाल एस.डी.साळुंके, पं.स.चे माजी सभापती शे.ताहेर मन्यार, डिगंबर पाटील, वजाहतअली काझी, सचिन महाजन, कृषी सहायक प्रशांत पवार उपस्थित होते. पाहणी करताना पाझर  तलावातून गाळ काढणे, नाले बांध व सिमेंट बंधारे यांची दुरुस्ती करणे तसेच नवीन बंधार्याच्या बांधणीबाबत विचार करण्यात येऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचीही पाहणी करण्यात आली. अधिक क्षेत्र सिंचनाखाली कसे येईल याकरिता दुपारी दोन वाजेपर्यंत शिवार फेरी अंतर्गत पाहणी करण्यात आली. या वेळी मंडळ अधिकारी पी.एल.बाविस्कर, तलाठी व्ही.डी. पाटील, डी.व्ही.महाजन, राजेश देशमुख, हनुमंत महाजन यांच्यासह सहायक उपवन संरक्षक पी.आर.पाटील, वनश्री दशरथ पाटील, के.ए.जाधव, ए.जी.तडवी, विजय माळी आदी उपस्थित होते. 
कापडी पिशवीत प्रसाद
अमळनेर : स्वच्छ महाराष्ट्र अभियान मोहिमेला मदत म्हणून येथील मंगळदेव ग्रह मंदिरातर्फे महाप्रसादाचे वाटप प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांमध्ये करण्याचा निर्णय विश्‍वस्त मंडळाने घेतला आहे.