Breaking News

लोकमंथनच्या पाठपुराव्याने दत्तू गीतेंचा उलटा प्रवास सुरू

भिवंडी/ प्रतिनिधी - शंभर अपराधांचा घडा भरलेल्या पापी शिशुपालालाही कर्माचे फळ मिळाले हा इतिहास सर्वश्रूत असताना भिवंडी पंचायत समितीत तब्बल सोळा वर्ष भ्रष्टाचाराचे पाप करणारे शाखा अभियंता दत्तू गीते यांचा अंहकारी सुंभ जळत नव्हता,तथापी दै.लोकमंथनने सातत्याने पाठपुरावा करून दत्तू गीते आणि त्यांच्या माध्यमांतील दलाल सम्राटांचा अहंकार तोडून दाख विण्याचे आव्हान स्वीकारले होते.भिवंडी उपविभागाच्या उपअभियंता पदावर दत्तू गीते यांनी केलेले अतिक्रमण उध्वस्त करणारी वृत्तमालिका प्रसिध्द केल्यानंतर दत्तू गीते यांच्याकडे बळजबरीचा असलेला पदभार काढून घेत भिंवडीचे उपअभियंता म्हणून राजेंद्र लोखंडे यांची बदली करण्यात आली आहे.

कार्यासन अधिकारी अ.ज.कांबळे यांच्या आदेशाने दत्तू गीतेचा भागीदार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांची बदली करण्यात आल्याने दत्तू गीते यांची भिवंडी उपविभागावर असलेली मक्तेदारी संपली आहे.अति रिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांचीही बदली झाल्याने दत्तू गीते यांचा भ्रष्टाचार लकव्याच्या झटक्यात सापडला आहे.या दोन्ही बदली आदेशाने दत्तू गीते आणि चमच्यांच्या अहंकाराचा सुंभ जाळण्यात लोकमंथनला यश आले असून भ्रष्टाचाराचे वळही नजिकच्या काही दिवसात जाळून गीते कंपनीला पापाचे प्रायश्‍चित घेण्यास लोकमंथन भाग पाडील.
सोळा वर्ष शाखा अभियंता आणि तीन उपअभियंता पदाचा बळजबरीचा पदभार स्वतः ठेवून ठाणे जिल्हा परिषदेच्या भिवंडी पंचायत समिती बांधकाम उपविभागात भ्रष्टाचाराचे स्तोम माजविणारे दत्तू गीते यांचा अहंकाराला भरती आली होती.या अहंकाराला भिवंडीतील काही माध्यम सम्राटांनी रसद पुरविल्याने दत्तू गीतेंची हिम्मत वाढली,माध्यमातील गीते पंटर्स आणि स्वतः गीते यांनी थेट लोकमंथनलाही खासगीत चँलेंज करण्याचा प्रमाद केला होता.तथापी मंडळींच्या बोंबांकडे दुर्लक्ष करून लोकमंथनने आपले काम सुरू ठेवले.त्याचा प हिला परिणाम समोर आला असून या काळात दत्तू गीते यांच्या नावावर असलेला भ्रष्टाचारही चौकशीच्या गर्तेत येईपर्यंत गीते हटाव कार्यक्रम सुरू राहणार आहे.लोकमंथन हेतू सिध्दीशिवाय स्वस्थ बसत नाही हा इशारा मुद्दामहून गीतेंच्या भ्रष्ट रसदवर पोसल्या जाणार्या माध्यम सम्राटांसाठी आहे.(क्रमशः)