Breaking News

मोदी यांच्या भाषणाने गरिबांची पोटे भरतील का? युपीएनेत्या सोनिया गांधी यांचा पंतप्रधानांना सवाल

विजापूर : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचे सूप वाजण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने प्रचार शिगेला पोहोचला आहे. युपीए अध्यक्षा सोनिया गांधी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत. विजापूर येथील सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदी उत्तम वक्ते आहेत. एखाद्या कसलेल्या अ भिनेत्यासारखे भाषण करतात. मात्र, त्यांच्या भाषणांनी गरिबांची पोटे भरणार आहेत का ? असा प्रश्‍न सोनिया गांधींनी विचारला आहे.

दोन वर्षांच्या अंतरानंतर सोनिया गांधी यांनी प्रचारसभेला संबोधित केले. त्यामुळे सोनिया काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बिजापूर येथील सभेत बोलताना सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार निधी वाटपात कर्नाटकशी दुजाभाव करत असल्याचा गंभीर आरोप केला. पंतप्रधान मोदी काँग्रेसमुक्त भारताच्या गोष्टी करतात. कदाचित त्यांना भूताने झपाटले आहे. काँग्रेसमुक्त भारत सोडा, ते आपल्यासमोर कोणाला सहन करत नाही, असा टोला सोनिया यांनी लगावला. प्रचारसभेत बोलताना सोनिया गांधी यांनी निधी वाटपात कें द्र सरकार दुजाभाव करत असल्याचा गंभीर आरोप केला. देशात दुष्काळाचे सावट आहे. त्यासाठी केंद्राने मोठ्या प्रमाणावर निधी राज्यांना दिला आहे. मात्र, कर्नाटकाच्या वाट्याला सर्वात कमी निधी आल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून हाच सरकारचा सबका साथ सबका विकास आहे का ? असा सवाल सोनिया गांधी यांनी विचारला.