Breaking News

रणजीत हांडेंच्या डेब्रीज घोटाळ्याला अरविंद सुर्यवंशींच्या बनावट टिपणीची साक्ष

मुंबई/ विशेष प्रतिनिधी - मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील विविध साबां मंडळात झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचे पाप मुंबई साबां अधिक्षक अभियंता कार्यालयातून सुरू असल्याचे मंत्रालय डेब्रीज घोटाळ्यातही स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यातील मुख्य संशयीत शहर इलाखा साबांचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि नाशिक साबांचे विद्यमान अधिक्षक अ भियंता रणजीत हांडे यांनी मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांची दोन दिवसापुर्वी भेट घेतल्यानंतर सादर झालेला डेब्रीज घोटाळा अहवाल या षडयंत्राची साक्ष देत आहे, दरम्यान या डेब्रीज घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्ती करावी अशी मागणी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केली आहे. 

सन 2015 - 16 या आर्थिक वर्षात मंञालय इमारतीतुन तब्बल 897 ट्रक्स डेब्रीज बाहेर काढण्यासाठी 34 लाखांचा निधी खर्च झाल्याचे तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी दाखवले आहे. हा आरोप व्हायरल होऊ लागल्यानंतर दै. लोकमंथनने दि. 27 डिसेंबर 2016 रोजी मंत्रालयात डेब्रीज घोटाळ्याचे वृत्त प्रसिध्द करून शासानाचे लक्ष वेधले होते. जवळपास नऊशे ट्रक्स डेब्रीस मंत्रालायात आले कुठून? एवढ्या ट्रक्स (प्रतिदिन 40/45) मंत्रालयात पार्क कशा झाल्या? एवढे मजुर कुठून आणले? या मजूरांना मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी गृह विभागाने पास कधी दिले? यासारखे काही मुद्दे लोकमंथन सातत्याने उपस्थित करीत आहे. या मुद्यांच्या पार्श्‍वभूमीवर 23 मार्च 2015 ते 24 नोव्हेंबर 2015 या क ालावधीत शहर इलाखा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले रणजीत हांडे यांनी केलेल्या वर्क आर्डर आणि वस्तुस्थिती भ्रष्टाचार झाल्याचे सिध्द करीत असल्याने रणजीत हांडे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमंथनने उपस्थित केलेल्या मुद्यांवर मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी घाई घाईने खुलाशाची टिप्पणी सादर केली असून रणजीत हांडे यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे लोकमंथनने पुन्हा शहर इलाखात्यातील भ्रष्टाचाराचे डेब्रीज खोदण्यास सुरूवात केल्यानंतर नाशिकचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांनी अरविंद सुर्यवंशी यांची भेट घेतल्यानंतर हा टिपण्णी खुलासा सादर झाल्याने संशयाला वाव मिळाला आहे.
अरविंद सुर्यवंशी यांनी सादर केलेला खुलासा अहवालही भ्रष्टाचार झाल्याचे दर्शवित असून याविषयी सविस्तर वृत्तांत वृत्तमालिकेच्या ओघात येणार आहेच.
मात्र तत्पुर्वी आ. चरणभाऊ वाघमारे यांनीही मंत्रालय इमारत सामान्य प्रशासनाच्या अखत्यारीत आहे, मंत्रालय इमारतीची सुरक्षा गृहविभागाकडे आहे आणि चर्चित डेब्रीज घोटाळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित असल्याने सामान्य प्रशासन, गृह विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन सदस्यांच्या समितीमार्फत या डेब्रीज घोटाळ्याची चौक शी करावी अशी मागणी केली आहे.(क्रमशः)


शाखा अभियंता मंडगेंचा कार्यकाल संशयास्पद
दि. 23/3/2015 ते 24/11/2015 या कालावधीत शहर इलाखा विभागात कार्यकारी अभियंता असलेले रणजीत हांडे यांनी मलबार शाखेसाठी मंडगे नामक शाखा अभियंत्यांची खास नियुक्ती केली. मंडगे यांनी या काळात 2 कोटीहुन अधिक बीले काढल्याची चर्चा असून हांडे यांच्या बदलीनंतर त्यांचीही बदली होण्याचा योगायोग जुळून आल्याने मंडगे यांचाही कार्यकाल संशयास्पद मानला जात आहे. यावर अधिक प्रकाशझोत उद्याच्या अंकात...