Breaking News

पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात उन्नती सोशल फाउंडेशन प्रथम

पुणे, दि. 8, मे - पाणी फाउंडेशच्या वतीने चला गावाकडे या उपक्रमांतर्गत महाश्रमदान दिन आयोजित करण्यात आला. या आवाहनाला साथ देत पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या सुमारे 200 सदस्यांनी पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात श्रमदान केले. या स्पर्धेत पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनला प्रथम क्रमांक मिळाला. 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अनेक गावांत या दिवशी लाखो नागरिकांनी सहभाग घेऊन महाश्रमदान केले. अनेक गावांत स्पर्धा घेण्यात आल्या ज्या टीमने चांगले व जास्त काम केले आशा टीमला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात ठिकठिकाणचे 18 गटातून सुमारे 600 नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी गावकर्‍यांनी कामाची पाहणी करून स्पर्धेचे बक्षीस जाहीर केले यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आले. प्रथम क्रमांक पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशनला मिळाला. संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे यांना पानवडीचे सरपंच सुषमा भिसे व पुरंदर पंचायत समिती सदस्य नलिनी लोळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.