Breaking News

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भन्नाट गाड्यांची राष्ट्रीय स्पर्धेत धूम

सोलापूर, दि. 08, मे - ऑर्किड अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांनीच विविध गाड्यांची निर्मिती करून अभियांत्रिकी कौशल्य चाचणी यशस्वी पार केली. ट्रेंटीम ब्रह्मोज, राईजिंग रेंजर्स, तीफन अशा तीन गाड्यांची निर्मिती करून वाहन निर्मितीचा ट्रेंड रूजविला. फॉर्म्युला भारत (2018) नॅशनल सोलार व्हेईकल चॅलेंज 2018 अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. फॉर्म्युला भारतची कोईमतूर येथे झालेल्या स्पर्धेत टीम ब्रह्मोज द्वारे 23 विद्यार्थ्यांनी स्पर्धा गाजविली. स्पर्धेत 113 संघ सहभागी झाले होते. संकल्पना, डिजाईन व मॅन्युफॅक्चरिंग टीमचे स्वत:चे होते. ही फॉर्म्युला कार आंतरराष्ट्रीय मानके, दर्जा व निकषांनुसार आणि आयोजकांनी दिलेल्या नियमावलीप्रमाणे बनवावी लागते. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाची ही एकमेव कार राष्ट्रीय स्तरावरील डिझाईनमध्ये 14 वी व सर्व सहभागी संघामध्ये 29 व्या स्थानावर राहिली. विद्यार्थ्यांनी दिवसरात्र मेहनत करून एकूण नऊ महिन्याच्या कालावधीत ही निर्मिती के ली होती. आपला प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यातील सक्षम अभियंता व्हावा या उद्देशाने व्यवस्थापनाच्या भक्कम पाठबळावर, तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली, पालकांच्या परवानगीने विद्यार्थ्यांनी आठ आठ तास वर्कशॉपमध्ये काम करून स्वत: निर्मितीच्या क्षणांना अनुभवले आहे. वेळेचे नियोजन यांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. मेतन यांनी केले होते.तृतीय व अंतिम वर्षातील मुलांना अशा स्पर्धा म्हणजे नवीन शिकण्याची पर्वणी असते. ऑर्किडमधून जवळपास 100 विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली. सोलापूर परिक्षेत्रात अशा स्पर्धात्मक वाहन निर्मितीचा पायंडा ऑर्किडनी घालून दिला व ट्रेंड रूजवला आहे, असे प्राचार्य डॉ. जे.बी. दफेदार यांनी सांगितले.