Breaking News

दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब परीक्षा केंद्र; परिसरात मनाई आदेश जारी

सांगली  - सांगली व मिरज शहरामध्ये दिनांक 13 मे 2018 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब परीक्षा-2018 एकूण 27 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभारी जिल्हादंडाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात दिनांक 13 मे 2018 रोजीचे सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.

या आदेशानुसार वरील वेळेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास तसेच एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. परीक्षा वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास तसेच परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश क ायदेशीर कर्तव्य बजावित आलेल्या शासकीय कर्मचार्‍यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे प्रभारी जिल्हादंडाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.