देवगडमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू
देवगड – येथील देवगड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू करत असून या स्कूलचे पालकत्व स्वीकारले असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी आ. नितेश राणे म्हणाले की, भावी पिढी कुठल्या दर्जाचे शिक्षण घेते, त्यांना सवलती काय मिळतात यावर त्या भूभागाचे भवितव्य अवलंबून असते. प्रवाहाविरुद्ध जाऊन तुम्ही इंग्लिश मीडियम स्कूल उभे केले. ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे काळ बदलला, देवगडचा आमदार बदलला. यामुळे देवगडचे भवितव्यही बदलत आहे. माजी मुख्यमंत्री व खा. नारायण राणे यांचे जिल्हय़ावर शैक्षणिकदृष्टय़ा बारीक लक्ष आहे. पूर्वी महाराष्ट्रात ‘लातूर पॅटर्न’ ओळखला जात होता. गेले सहा-सात वर्षे महाराष्ट्रात ‘कोकण पॅटर्न’चा बोलबाला आहे.