अपघातांबाबत जनजागृती करूनही राज्यातील रस्ते अपघात कमी झालेले नसून जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांतच ३,३६१ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. महामार्ग पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली. देशात अपघातांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य तिस-या क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये एकूण ३५ हजार ८५३ अपघात झाले होते. यामध्ये ११ हजार २२० मनुष्यहानी झालेली असून त्यात १२ हजार २६४ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्तांमध्ये २५ ते ४५ वयोगटातील पुरुष आणि महिलांचा समावेश आहे.