Breaking News

एमआयडीसीमध्ये पाणी कपातीचे धोरण


पुणे, दि. 12, मे - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही भागातील नागरिकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पाणी पुरवठा केला जातो. मात्र, एमआयडीला पाणी टंचाई जाणवत असल्याने त्यांनी कपातीचे धोरण आखण्याची तयारी सुरू केली आहे. तसे एमआयडीसीने महापालिकेला कळविले असताना महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

एमआयडीसकडून महापालिकेच्या हद्दीतील भागाला विविध व्यासाच्या 12 नलिका जोड दिल्या आहेत. त्याद्वारे दररोज 30 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. निगडी गावठाण, केएसबी चौक, बजाज ऑटो, मोरवाडी, भोसरी, गवळी माथा, लांडेवाडी आदी भागाचा त्यात समावेश आहे. दररोज सुमारे 10 हजार नागरिक एमआयडीसीने पुरविलेले पाणी पितात. त्यात गेली कित्येक दिवसांपासून एमआयडीने कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.