वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड ; चार महिलांसह पुरुष अटकेत
भंडारा, दि. 12, मे - जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैद्ध धंद्दे व इतर गुन्हेगारीवर भंडारा पोलीस अधिक्षीका वनिता शाहु यांनी धडक मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे अवैद्ध धंद्यावर अंकुश लागला आहे. भंडारा शहरापासुन तीन किलोमिटर असलेल्या खोकर्ला गावात मागील काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरु होता. याची माहीती असताना सुद्धा नागरिक गप्प होते.
मात्र काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी याची खात्री केली व सापळा रचला. खोकर्ला गावात भाड्याच्या घरात राहत असलेली महिला ही आपल्या आर्थिक फायद्याकरिता स्वत: व इतर मुलींना फूस लावुन वेश्या व्यवसाय करत होती. या महिलेच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने धाड टाकत चार महिला व एका पुरुषाला अटक केली. त्यांच्या विरुद्ध स्त्रियांचा अनैतिक व्यापार कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.