Breaking News

न्यायालयात गँगवॉर : 6 आरोपींना 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद, - कुख्यात गँगस्टर इम्रान मेहंदींवर सत्र न्यायालयाच्या आवारात हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. या 10 आरोपींपैकी सहा आरोपींना 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी दिले. हबीब इद्रिस हबीब मोहम्मद, हबीब खालेद हबीब मोहम्मद, मोहम्मद खालेद मोहम्मद अझहर, शेख फय्याद शेख रियाज, सलीम बिन जुमान बिन माजी, शेख अतिक शेख लतीफ यांना 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


कुख्यात गँगस्टर इम्रान मेहंदी याने मार्च 2012 साली माजी नगरसेवक सलीम कुरैशी यांचे अपहरण करून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. तसेच त्याच्यासह अन्य पाच जणांची हत्या केल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे इम्रान मेहंदी याच्यावर मोक्का लावण्यात आला. त्यामुळे मेहंदीला सुनावणीसाठी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी संपल्यावर परत नेत असतानाच सलीम कुरैशी व इम्रान मेहंदी या दोन्ही गटांकडून परस्परांवर दगडफेक करण्यात आली.