पत्रकाराच्या परिवारातील लग्नात स्नेहांकुर संस्थेला आर्थिक मदत
अहमदनगर (प्रतिनिधी)- लग्न समारंभ, विवाह सोहळे म्हंटले की, पोकळ डामडौल करीत अनाठायी खर्च केला जातो. चालिरिती व परंपरेच्या नावाखाली अनावश्यक उधळपट्टी होताना दिसते. या पार्श्वभुमीवर अनाठायी खर्चाला फाटा देत पत्रकाराच्या परिवारातील चि.धनंजय व चि.सौ.कां. तृप्ती यांच्या विवाहात अनाथ नवजात बाळकांचा सांभाळ करणार्या स्नेहांकुर संस्थेला आर्थिक मदत देण्यात आली.
जामखेड येथील स्व.बाळासाहेब देशपांडे यांचे नातू व जिल्हा शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब एकबोटे यांचा मुलगा धनंजय व दत्ताजी नाईक यांची कन्या तृप्ती यांचा विवाह नगर येथील सिटी लॉनमध्ये थाटात पार पडला. धनंजय हे महावितरणमध्ये उप अभियंता म्हणून कार्यरत असून, ते ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे यांचे पुतणे आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त इतर खर्चांना फाटा देवून सामाजिक संस्थेला मदत करणे योग्य राहणार असल्याची कल्पना प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी सुचवली. देशपांडे परिवाराने या सुचनेचे स्वागत करुन विवाह सोहळ्यात स्नेहांकुर संस्थेला आर्थिक मदत दिली.
विवाह सोहळा संपन्न होताच बोहल्यावर असणार्या वधू-वरांच्या साक्षीने देशपांडे परिवाराच्या वतीने रोख 11 हजार रुपयाची आर्थिक मदत जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुनार शर्मा व प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या हस्ते स्नेहांकुर संस्थेला देण्यात आली. स्नेहालयाचे जनसंपर्क अधिकारी सचिन ढोरमळे व भरत कुलकर्णी यांनी या मदतीचा स्विकार केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे, संदेश कार्ले, रामदास भोर, जिल्हा माहिती अधिकारी दिपक चव्हाण, महापौर सुरेखा कदम, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र झोंड, सुधीर लंके, रामदास ढमाले, बाळासाहेब बोठे, अनिरुध्द देवचक्के, विजयसिंह होलम, अनंत पाटील, महेश महाराज देशपांडे, दिलीप वाघमारे, भूषण देशमुख, अॅड.शिवाजी कराळे, सुनिल रामदासी आदिंसह पत्रकार, राजकीय पुढारी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.