आयसीएसई-१० आणि आयएससी-१२वीचा निकाल १४ मे रोजी
नवी दिल्ली : आयसीएसई-१० आणि आयएससी-१२वीचा निकाल सोमवार (१४ मे) रोजी जाहीर करणार असल्याची माहिती भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या (सीआयएसईसी) च्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. दुपारी तीन वाजेनंतर 'सीएआरईईआरएस' या पोर्टलवर हे निकाल पाहता येणार आहेत. याबरोबरच 'एसएमएस'द्वारेही मोबाईलवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. 'एसएमएस'द्वारे निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी इंग्रजीत 'आयसीएसई' किंवा 'आयएससी' टाइप केल्यानंतर त्यापुढे सात अंकी युनिक आयडी कोड नमूद करावा व हा संदेश ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवावा, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव गेरी अराथून यांनी दिली.